Day 2 Of ‘The Jaipur Dialogues’ : जागतिक पातळीवर भारताला मागे ढकलण्याचे षड्यंत्र !

‘द जयपूर डायलॉग्ज’च्या परिषदेचा दुसरा दिवस

जयपूर (राजस्थान) : पाश्‍चिमात्य देशांमध्ये खलिस्तान आणि इस्लाम यांची चर्चा होते. बहुसंख्यांक समाज यापासून अनभिज्ञ आहे; पण आपण आपला शत्रू ओळखला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताला मागे ढकलण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. ३ दिवसांच्या ‘द जयपूर डायलॉग्ज’च्या ९व्या वार्षिक परिषदेच्या दुसर्‍या दिवशी देश-विदेशातील विचारवंत, राष्ट्रवादी आणि नामवंत वक्ते यांनी हे मत व्यक्त केले.

‘जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित

या वेळी ‘जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित यांनीही विविध सत्रांमध्ये भाषण करून विविध विषयांवर त्यांची मते मांडली. यंदाच्या विचारांचे आदान-प्रदान हे ‘रिक्लेमिंग भारत’ (भारतीयत्व परत आणणे) या सूत्राच्या आधारे केले जात आहे.

‘इस्लाम आणि खलिस्तान’ या विषयावर चर्चासत्र

‘इस्लाम आणि खलिस्तान’ या चर्चासत्राच्या वेळी व्यासपिठावरील मान्यवर डावीकडून सर्वश्री पंकज सक्सेना, देवदत्त मांझी, रमणिक मान, धीरेंद्र पुंदिर, डॉ. कुलदीप दत्त, अविनाश धर्माधिकारी आणि नीरज अत्री

‘इस्लाम आणि खलिस्तान’ या विषयावरील चर्चासत्रात सैन्याची पार्श्‍वभूमी असलेले रमणिक मान म्हणाले की, सनातन-शीख हा धर्म आहे, ज्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष १९८४ मधील शीख दंगल, हे त्याचे उदाहरण आहे. काँग्रेसचे नेते परदेशात जाऊन फुटीरतावादाला खतपाणी घालतात. वर्ष १९४७ मधील फाळणीने खलिस्तानला जन्म दिला.

याच चर्चासत्रात नीरज अत्री, पंकज सक्सेना, देवदत्त मांझी, अविनाश धर्माधिकारी आदींनी ‘मुस्लिम लीग’वर देशात विविध प्रकारचे जिहाद करून देश तोडला जात असल्याची आणि देशाला कमकुवत केल्याची माहिती दिली आणि वेळीच शत्रू ओळखून पालटण्यावर भर दिला. या वेळी ‘हिंदुत्वावरील हॅटट्रिक’ पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

‘जगाला पाेखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे प्रकाशन करतांना हिंदुत्‍वनिष्ठ आणि सर्वांत उजवीकडे पुस्तकाचे लेखक श्री. अभिजित जोग

राष्ट्रवादी चित्रपटांच्या निर्मितीचा आवश्यकता ! : ‘बॉलीवूड, ओटीटी आणि सामाजिक माध्यमे’ या विषयावरील चर्चासत्रातील सूर

‘बॉलीवूड, ओटीटी आणि सामाजिक माध्यमे’ या चर्चासत्रात वैचारिक युद्धातून देशाची संस्कृती आणि सभ्यता नष्ट करणे अन् देशाविरुद्ध कथानक निर्माण करून सनातन धर्म अन् हिंदुत्व नष्ट करणे, या आव्हानांवर चर्चा करण्यात आली. वक्त्यांनी सांगितले की, आपल्याला राष्ट्रवादी चित्रपट बनवावे लागतील आणि गोंधळात टाकणार्‍या दृकश्राव्य चित्रांचा प्रतिकार करावा लागेल. या सत्रात अभिजीत जोग, अंबर झैदी, अभिषेक तिवारी, पंडित सतीश शर्मा आणि प्रतीक बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले.

सामान्य मुसलमानांना इस्लामचे अत्यल्प ज्ञान ! : ‘पाकिस्तानची समस्या’ या विषयावरील चर्चासत्रातील मान्यवरांचे मत

‘पाकिस्तानची समस्या’ या विषयावरील चर्चासत्रात कर्नल अजय रैना, टिळक देवसर आणि सुशांत सरीन यांनी भारत-पाकिस्तान संबंध, तसेच पाकिस्तानच्या दुटप्पीपणावर चर्चा केली. ते म्हणाले की, पाकिस्तानला वर्ष १९४७ पासून एक राष्ट्र म्हणून वागवले जात आहे; परंतु तो देशविरोधी कारवाया करत आहे. भारतातील देवबंदमध्ये शिक्षण दिले जाते; मात्र पाकिस्तानातील देवबंदमध्ये पदवीनंतर एके ४७ दिली जाते. सामान्य मुसलमानांना इस्लामचे अत्यल्प ज्ञान आहे.

चित्रपट, फॅशन आणि अगदी खाद्यपदार्थांमध्ये इस्लाम अन् पाश्‍चिमात्य देशांचा हस्तक्षेप ! : ‘भारत तेरे टुकडे होंगे’  या विषयावरील चर्चासत्रातील मत

‘भारत तेरे टुकडे होंगे’ या चर्चासत्रात कर्नल आर्.एस्.एन्.सिंह, बाबा रामदास आणि अभिजीत चावडा यांनी भारतात चालू असलेल्या धोरणात्मक, सामरिक, राजकीय, वैचारिक अन् संस्कृत उपक्रमांवर चर्चा केली. ते म्हणाले की, सनातन धर्मावर केवळ मुसलमानच नव्हे, तर पाश्‍चात्य देशांकडूनही (ख्रिस्त्यांकडूनही) आक्रमण होत आहेत. हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक आक्रमण आपण धर्मांतराच्या रूपाने पहात आहोत. चित्रपट, फॅशन आणि अगदी खाद्यपदार्थांमध्ये इस्लाम अन् पाश्‍चिमात्य देशांचा हस्तक्षेप वाढत आहे. हे धोकादायक आणि देशाचे तुकडे करण्याचे षड्यंत्र आहे.

देशात हिंदूंना तीर्थयात्रेसाठी अनुदान नाही; मात्र हजसाठी अनुदान ! : ‘सनातन धर्म आणि गौतम बुद्ध’  या विषयावरील चर्चासत्रातील विचार

‘सनातन धर्म आणि गौतम बुद्ध’ या विषयावरील चर्चासत्रात चर्चा करतांना लेखक अजय चुंगरू आणि अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी हिंदु मंदिरांमधील सरकारी हस्तक्षेपाविषयी चिंता व्यक्त केली. अजय चुंगरू म्हणाले की, मंदिरांच्या भूमीचे वक्फमध्ये रूपांतर केले जात आहे. वक्फ बोर्डाच्या कर्मचार्‍यांना ‘सरकारी कर्मचारी’ म्हटले जाते. त्यांना अनेक विशेषाधिकार देण्यात आले आहेत. अधिवक्ता विष्णू शंकर जैन म्हणाले की, इतर देशांतील अल्पसंख्यांक समान नागरी अधिकारांवर विश्‍वास ठेवतात, तर भारतात बहुसंख्यच केवळ या कायद्याची मागणी करत आहेत. देशात हिंदूंना तीर्थयात्रेसाठी अनुदान दिले जात नाही; परंतु हजसाठी मात्र अनुदान दिले जाते. बहुसंख्य समाजाला त्यांची मंदिरे त्यांना नियंत्रित करण्यास दिली जावीत, अशी मागणी करावी लागत आहे.

‘जयपूर डायलॉग्ज’च्या परिषदेला उपस्थिती  हिंदुत्‍वनिष्ठ आणि विचारवंत

शेवटच्या दिवसातील विषय लवकरच प्रसिद्ध करीत आहोत. . .

२७ ऑक्टोबरला, म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी ‘आत्मनिर्भर भारतासमोरील आव्हाने’, ‘भूराजकारण आणि भारत’, ‘वर्ष २०२९ चे राजकारण’ या विषयांवर कर्नल अजय रैना, मेजर जनरल राजीव नारायण, नसीर अहमद शेख, संक्रांत सानू, विभूती झा यांच्यासह अनेक वक्ते, लेखक, विचारवंत यांनी ‘मल्टी डोमेन थ्रेट’ (विविध स्तरांवरील धमक्या), ‘हिंदुत्व विरुद्ध इस्लाम’ इत्यादी विषयांवर त्यांची मते मांडली.


हे ही वाचा →

Concluding Day – The Jaipur Dialogues : ‘सनातन हिंदु संकल्प पत्रा’चा प्रस्ताव प्रसिद्ध !

संपादकीय  ‘रिक्लेमिंग भारत’ अत्यावश्यक !