‘श्री खणविहार सेवाभावी मित्र मंडळा’च्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार वितरण !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाप्रसाद वितरण करतांना श्री. विजय कुंभार

कोल्हापूर, १३ एप्रिल (वार्ता.) – ‘श्री खणविहार सेवाभावी मित्र मंडळा’च्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाप्रसाद आणि पुरस्कार वितरण करण्यात आले. यात ज्येष्ठ सदस्य श्री. नामदेव सूर्यवंशी, श्री. भरत हराळे, श्री. विलास निकम, श्री. हिंदुराव फाळके, श्री. प्रभाकर तांबट यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन, तर खण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या सर्वश्री अशोक पाटील, गणेश महाजन, बाळासाहेब शिंदे, रूपेश शिंदे, दीपक सरनाईक, युवराज चव्हाण यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. सुहास इंगवले, उपाध्यक्ष श्री. विजय कुंभार, श्री. धनंजय लिंगम आणि संचालक मंडळ यांसह कार्यकर्ते, भाविक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.