हे रामराया, सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।

तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला पुरोगाम्यांचा विरोध आणि न्यायालयांचा निवाडा !

या सोहळ्यामध्ये अडथळे आणण्यासाठी मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध प्रकारच्या याचिका प्रविष्ट करण्यात आल्या. एकंदरीत पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष उफाळून आला होता. सुदैवाने यावेळी त्यांना न्यायालयाकडून कुठलाही लाभ मिळाला नाही.

दांभिकतेची अडगळ !

पराकोटीचा हिंदुद्वेष विरोधकांना खड्डयात घालणार ! ५०० वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी या दिवशी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण साजरा झाला. त्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी नेमाडे आणि इतर काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात बिब्बा घालत आहेत.

श्रीरामाचा अवमान करणार्‍या सोहेल याला कुडचडे येथील श्री रामभक्तांनी सर्वांसमक्ष क्षमा मागण्यास भाग पाडले !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या गोव्यात ४ घटना घडल्या आहेत.

Anti-Hindu Kerala Govt : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सुटी घोषित करणार्‍या शाळेची चौकशी करण्याचा केरळ सरकारचा आदेश !

केरळच्या साम्यवादी सरकारला श्रीरामाविषयी प्रेम नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! मंदिराऐवजी मशिदीचे उद्घाटन असते, तर साम्यवादी सरकारनेच सुटी घोषित केली असती !  

Vadodara Procession Attacked : आज आमच्यासमोर येणार्‍या हिंदूंना ठार करणार, आम्ही हिंदूंना कापणार ! – धर्मांध मुसलमान

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान धमकी देत आक्रमणे करत असतील, तर यावरून आता हिंदूंना केवळ संघटित होणेच नाही, तर स्वरक्षणासाठी प्रशिक्षित होण्याचीही आवश्यकता आहे, हेच दिसून येते.

श्रीराममंदिरात श्री रामललाच्या आणखी २ मूर्ती स्थापित केल्या जाणार !

मंदिरातील वरच्या मजल्यांवर स्थापित करण्यात येणार आहेत, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे. या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.

(म्हणे) ‘आमची वेळ येईल, तेव्हा तुमचा शिरच्छेद करू !’ – धर्मांध मुसलमान

श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !

अयोध्या येथील श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तुर्भे (वाशी) येथे विविध कार्यक्रम !

तुर्भे गाव येथील पुरातन श्री रामतनुमाता मंदिरात सकाळी आणि दुपारी श्रीरामरायाची आरती, भजन, नामस्मरण, तसेच सायंकाळी महाआरती आणि प्रसाद आणि दीपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

…हा नवीन भारताचा प्रारंभ आहे !

श्रीराममंदिर उभे राहिले, म्हणजे सगळे झाले’, असे मुळीच नाही. हा नवीन भारताचा प्रारंभ आहे. आता  हे रामराज्य घडवण्याची, वाढवण्याची, टिकवण्याची आणि वैयक्तिक जीवनात मर्यादापुरुषोत्तमाचे गुण अंगीकारण्याची, म्हणजेच धर्माचरण करण्याचे उत्तरदायित्व समस्त हिंदूंचे आहे !