
इंदूर (मध्यप्रदेश) – सुरक्षेच्या आघाडीवर भारत फारसा भाग्यवान देश नाही. आपले सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण शांतपणे आणि निश्चिंतपणे बसू शकत नाही. आपले शत्रू आत असोत कि बाहेर, नेहमी सक्रीय असतात. या परिस्थितीत आपण त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. त्यांच्या विरुद्ध योग्य वेळी कठोर आणि प्रभावी पावले उचलली पाहिजेत, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे सैनिकांना संबोधित करतांना केले. सिंह दोन दिवसांच्या दौर्यावर असतांना सैन्याच्या महू छावणीत आले होते.