देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

नागपूर – भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देणारी मोठी यंत्रणा नागपूर पोलिसांनी कारवाई करत उघडकीस आणली. या नोटा मजुरांच्या माध्यमातून पालटण्यात येत होत्या. या यंत्रणेचे धागेदोरे देहली, गुजरात आणि उत्तरप्रदेश येथेपर्यंत आहेत. नोटा पालटणार्या टोळीचा प्रमुख अनिलकुमार जैन आहे. त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या नोटा पालटल्या. या कामासाठी तो लोकांना ३०० रुपये देत असे. दीड वर्षापासून हा प्रकार चालू आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा