आमदार सुरेश धस यांच्याविषयीच्या तक्रारीचे प्रकरण
मुंबई – महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्याविषयीचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोचवणारे आहे. त्यामुळे आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे, तसेच वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे, असे महिला आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
सरकारकडून महिलांचा आदर राखला जाईल ! – मुख्यमंत्री
मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाईची मागणी केली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महायुती सरकारकडून महिलांचा आदरच राखला जाईल. कुणाच्याही प्रतिमेला बाधा पोचणार नाही किंवा कुणाचीही अपकीर्ती होणार नाही. तुमच्यावर अन्याय होणार नाही. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’’