वडोदरा येथील मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून मशिदीजवळ धमक्या देत आक्रमण !
वडोदरा (गुजरात) – श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मेहसाणा आणि वडोदरा येथे मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. यात काही हिंदू घायाळ झाले. वडोदराच्या भोज गावामध्ये नगिना मशिदीजवळ झालेल्या आक्रमणात काही महिला घायाळ झाल्या. पोलिसांनी या प्रकरणी २६ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या वेळी धर्मांध मुसलमान ‘आज आमच्यासमोर येणार्या हिंदूंना ठार करणार. आम्ही २ ते ४ हिंदूंना कापणार’, अशा धमक्या देत होते. या धमक्यांची नोंद प्रथम दर्शनी अहवालामध्ये करण्यात आली आहे.
१. पोलिसांच्या प्रथम दर्शनी अहवालामध्ये म्हटले आहे की, मिरवणूक दुपारी २ वाजता भोज गावातील श्रीराममंदिरापासून प्रारंभ झाली. यात ५०० ते ७०० हिंदू सहभागी झाले होते.
२. ही मिरवणूक नगिना मशिदीजवळ पोचल्यावर डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) बंद करण्यात आला. या वेळी काही मुसलमान हिंदूंना धमक्या देऊ लागले. ते म्हणत होते, ‘पुन्हा येथे मिरवणूक आणण्याचा प्रयत्न करू नका; कारण आम्ही आज २ ते ४ हिंदूंना कापणार आहात. जेवढे हिंदू सापडतील त्यांना ठार करणार आहेत.’ यानंतर त्यांनी हिंदूंवर आक्रमण चालू केले. ते आक्रमण करतांना ‘कुणालाही सोडू नका’, असे म्हणत होते.
३. आक्रमणाच्या पूर्वी हिंदूंनी रस्त्यांवरील खांबांवर लावण्यात आलेले भगवे ध्वज धर्मांधांनी काढून फेकून दिल होते. (धर्मांधांची मानसिकता काय आहे, हे आधीच स्पष्ट होऊनही बेसावध राहिलेले हिंदू आणि पोलीस ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|