(म्हणे) ‘आमची वेळ येईल, तेव्हा तुमचा शिरच्छेद करू !’ – धर्मांध मुसलमान

वडोदरा (गुजरात) येथील ३ धर्मांध मुसलमानांकडून श्रीराममंदिरावरून हिंदूंना धमकी

वडोदरा (गुजरात) – येथील साधली गावातील हमजा खत्री, फैजान नानियो आणि जुनेद कुरैशी या ३ तरुणांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट प्रसारित करून श्रीराममंदिर पाडण्याची धमकी दिली आहे. या तरुणांनी २२ जानेवारीला श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या संदर्भात इन्स्टाग्रामवरून धमकी देतांना लिहिले होते, ‘जेव्हा आमची वेळ येईल, तेव्हा सर्वांचा शिरच्छेद केला जाईल.’ तसेच त्यांनी बाबरी ढाच्याचे चित्रही या पोस्ट समवेत ठेवले होते. ही पोस्ट सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची नोंद घेत चौकशी चालू केली.

संपादकीय भूमिका 

श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !