श्रीरामरूपी चैतन्य अवतरले हो अयोध्यापुरी।
भक्तरूपी फुले उमलली विश्वाच्या अंगणी।। १।।
साधना गतीने होण्या ठेवूया श्रीरामाला हृदयमंदिरी।
साधना अन् सेवा करूया शरण जाऊनी श्री गुरुचरणी।। २।।
बुडतो आम्ही अहंकाराने मायेच्या बाजारी।
कृपावत्सला श्रीरामा, तारावे आम्हा या भवसागरी।। ३।।
भीक घाला हो श्रीरामा, आम्हा भावभक्तीची।
करून घ्यावे नामस्मरण अन् सेवा समष्टीची।। ४।।
तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।। ५।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।। ६।।
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |