|
प्रयागराज – यंदाच्या महाकुंभपर्वासाठी ४० कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांनीही संपूर्ण कुंभपर्वाच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. पोलिसांनी महाकुंभपर्वासाठी ७ पदरी सुरक्षाव्यवस्था ठेवली असून तब्बल १० सहस्र पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात १३ तात्पुरती पोलीस ठाणी, तसेच २३ पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यासह निमलष्करी दल, सशस्त्र पोलीस दल, बाँबशोधक आणि नाशक पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आदी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. बस स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ येथून कुंभक्षेत्री येणार्या भाविकांसाठी पोलिसांची विशेष सुरक्षाव्यवस्था असणार आहे.
असा असेल फौजफाटा !
झोन (विभाग) ८, सेक्टर १८, तात्पुरती पोलीस ठाणी १३, स्थायी पोलीस ठाणी ४४, तात्पुरत्या पोलीस चौक्या २३, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २१ तुकड्या, राखीव तुकड्या २, प्रांतीय सशस्त्र दलाच्या ५ तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४ तुकड्या, एएस् चेक, १२ तुकड्या आणि बाँबशोधक आणि नाशक पथकाच्या ४ तुकड्या, असा फौजफाटा असणार आहे.