Anti-Hindu Kerala Govt : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सुटी घोषित करणार्‍या शाळेची चौकशी करण्याचा केरळ सरकारचा आदेश !

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने केरळच्या कासरगोडू जिल्ह्यातील प्रौढांसाठीच्या शाळांना सुटी घोषित करण्यात आली होती. याविषयी केरळ सरकारने चौकशीचा आदेश दिला आहे. सरकारकडून या दिवशी कोणतीही सरकारी सुटी घोषित केली नव्हती. तरीही या शाळेने सुटी घोषित केल्याने चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक शिक्षण सचिव वी. शिवनकुट्टी यांनी सार्वजनिक शिक्षण महासंचालकांकडून अहवाल मागवला आहे. ‘सामान्य शिक्षण विभागाकडून कोणतेही निर्देश नसतांना या शाळेला सुटी का घोषित करण्यात आली ?’, याविषयी २४ घंट्यात अहवाल सादर करावा’, असे सांगण्यात आले आहे.

(सौजन्य : News 24)

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पहाण्यास दिला होता नकार !

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी श्री रामलला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा राज्याचा कार्यक्रम म्हणून पहाण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की, राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी मी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नकार दिला. माझे घटनात्मक दायित्व पार पाडण्यासाठी राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता तत्त्वाचे पालन करण्यास मी कटीबद्ध आहे. (ढोंगी निधर्मीवाद्यांचा धर्मनिरपेक्षतावाद म्हणचे हिंदूंचा द्वेष आणि मुसलमानांना प्रेम, असा आहे. हिंदूंवर प्रेम केले आणि मुसलमानांना लाथाडले, तर ते धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात होते, असे गेले ७५ वर्षे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • केरळच्या साम्यवादी सरकारला श्रीरामाविषयी प्रेम नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! मंदिराऐवजी मशिदीचे उद्घाटन असते, तर साम्यवादी सरकारनेच सुटी घोषित केली असती !