पिंपरी (पुणे) शहरातील विज्ञापन फलकांमुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास फलक मालकाचे दायित्व !

येत्या काही दिवसांमध्ये वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने फलक पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास विज्ञापन फलकधारक उत्तरदायी असेल, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे.

Chhattisgarh Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये एकूण २९ नक्षलवादी ठार

या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्‍या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

Election Commission X Post : निवडणूक आयोगाकडून ‘एक्स’ला ४ पोस्ट हटवण्याचा आदेश !

‘एक्स’ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असले, तरी कोणतेही स्वातंत्र्य हे लोकशाही मूल्ये आणि त्या देशाचा कायदा यांपेक्षा वर नाही. हा भेद ‘एक्स’ने लक्षात घेतला पाहिजे !

पुणे येथे उजनी धरणातील पळसनाथ मंदिर भाविकांना दाखवण्यासाठी मासेमारांची विनामूल्य सेवा !

उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये पळसनाथ मंदिरासह राजवाडे, पूल पाण्याखाली गेले आहेत. सध्या धरणातील पाणीसाठा अल्प झाल्याने हे सर्व उघडे पडले असून ते पहाण्याचा दुर्मिळ योग भाविकांना येत आहे.

संपादकीय : सरकारी आस्थापनांचा पांढरा हत्ती !

आस्थापने आणि महामंडळे लाभात चालवू न शकणारे सरकार मंदिरे का कह्यात घेते ?

Mumbai HC Ram Navami : रामनवमीनिमित्तच्या यात्रांमुळे मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या !

उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना आदेश !

विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाची कारवाई !

मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्‍या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करा ! – राजू यादव

उंचगाव मंगेश्वर मंदिराची त्रैवार्षिक यात्रा १९ ते २४ एप्रिल या काळात होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. यात्राकाळात मंदिरासह अनेक ठिकाणी विद्युत् रोषणाई होते. तरी विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

महाराष्ट्र सरकारची ४५ आस्थापने तोट्यांत ! – ‘कॅग’चा अहवाल

महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांना किंवा आस्थापनांना ३ सहस्र ६२३ कोटी ४० लाख रुपये इतका तोटा झाला आहे. एकूण आस्थापनांपैकी ४५ आस्थापने तोट्यात, ४७ आस्थापने लाभात आहेत, तर १८ आस्थापनांनी ‘ना नफा ना तोटा’ अशी स्थिती दर्शवली आहे.