MP Liquor Ban : मध्यप्रदेशातील १७ पवित्र शहरांमध्ये दारूबंदी लागू !

मैहर शहरामध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळी मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्रीवर बंदी

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशात चैत्र नवरात्र आणि प्रमुख सण यांच्या निमित्ताने अनेक शहरांमध्ये मांसविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार १७ पवित्र शहरांमधील दारूची दुकाने १ एप्रिल २०२५ पासून कायमची बंद केली जाणार आहेत. नियम मोडणार्‍यांना सोडले जाणार नाही, अशी चेतावणी प्रशासनाने दिली आहे.

१. प्रशासनाने माता श्री शितलादेवीचे शहर असलेल्या मैहर येथे ३० मार्च ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत होणार्‍या चैत्र नवरात्र मेळ्यासाठी मांस, मासे आणि अंडी यांच्या व्रिकीवर बंदी घातली आहे. भाविकांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक वातावरणाचा आदर करण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी विकास सिंह यांनी सांगितले.

२. याखेरीज भोपाळ आणि इंदूर शहरांमध्ये श्रीरामनवमी (६ एप्रिल), महावीर जयंती (१० एप्रिल) आणि बुद्ध पौर्णिमा (१२ मे) या दिवशी मांस विक्रीची दुकाने बंद रहाणार आहेत. भाजपचे नेते राकेश सिंह आणि आमदार यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

संपादकीय भूमिका

अशी बंदी देशातील सर्वच धार्मिक आणि पवित्र शहरांत घालणे आवश्यक आहे. तसेच या बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी प्रशासन आणि पोलीस यांनी सतर्क राहिले पाहिजे !