शिर्डीच्या साईभक्तांना ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण !

साई संस्थानचा निर्णय !

शिर्डी – येथे येणार्‍या साईभक्तांना आता ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे; मात्र साईभक्तांनी दर्शनाला येण्याअगोदर साई संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली, तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधित किंवा कुटुंबीय यांना मिळणार आहे. अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. नोंदणी केलेली असल्यास भक्तांची ओळख पटवणे सोयीचे जाईल. जे नोंदणी करून येतील, त्यांचा विमा उतरवला जाईल.