Bihar Kalash Yatra Attacked : दरभंगा (बिहार) येथे चैत्र नवरात्रीच्या कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

  • अनेक हिंदू घायाळ

  • आक्रमणासाठी एका मुसलमानाच्या घराच्या गच्चीवर दबा धरून बसले होते धर्मांध

दरभंगा (बिहार) – येथे चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ३० मार्च या दिवशी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथे अलाउद्दीन नावाच्या व्यक्तीच्या घराच्या गच्चीवरून मुसलमानांनी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात अनेक हिंदू घायाळ झाले. या घटनेचे व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. यापूर्वी होळीच्या वेळीही येथे हिंदूंवर आक्रमण करण्यात आले होते. पोलीस आणि ग्रामस्थ यांनी परस्पर संवादातून हे प्रकरण त्या वेळी सोडवले, तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेल्या दगडफेकीनंतर संपूर्ण परिसरात तणाव आहे. (केवळ चर्चा करून धर्मांध मुसलमान शांत होतात, असे नाही, हेच यातून लक्षात येते. अशांवर कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. – संपादक) येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

असे झाले आक्रमण !

केवतगामा पंचायतीतमध्ये कलश यात्रेतील भाविकांवर अचानक दगडांचा वर्षाव चालू झाला. अचनाक झालेल्या दगडफेकीमुळे महिला आणि मुले ओरडत इकडे तिकडे धावू लागली. हिंदूंनी सांगितले की, आक्रमणासाठी मुसलमान आधीपासूनच घराच्या गच्चीवर दबा धरून बसले होते आणि ते कलश यात्रा येण्याची वाट पहात होते.

गावकर्‍यांनी सांगितले की, पछियारी राही गावात रहाणार्‍या महंमद अलाउद्दीनच्या घराच्या गच्चीवर मुसलमान जमा झाले होते. मिरवणूक या घराजवळून जाताच मुसलमानांनी दगडफेक चालू केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी गावातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. लोक घाबरले आहेत आणि घराबाहेर पडण्यास कचरत आहेत.

संपादकीय भूमिका

बिहारमध्ये आगामी विधानसभेची निवडणूक पहाता हिंदूंनी अशा घटना थांबवण्याचे ठाम आश्वासन देणार्‍यांना सत्तेवर बसवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !