India Mourns But Iqbal Hussain Celebrates   :  देश शोकमग्न, तर कर्नाटकचे आमदार इक्बाल हुसेन आनंदोत्सवात मग्न !

मार्च महिन्यात झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना आता वाटल्या साड्या !

इक्बाल हुसेन

रामनगर (कर्नाटक) – काश्मीरमधील पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या आतंकवादी आक्रमणात २६ हिंदूंची हत्या केली. संपूर्ण देश या नरसंहारात शोकमग्न आहे. या आक्रमणात हत्या झालेल्या दोन कन्नडिगांच्या (कर्नाटकच्या व्यक्ती) पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा स्थितीत रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनी मार्च महिन्यात झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने सहस्रो महिलांना आता साड्या वाटून आनंदोत्सव साजरा केला. (अशांना लोकप्रतिनिधी कसे म्हणायचे ? – संपादक)


पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप हिंदु पर्यटकांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. यात शिवमोग्गाचे मंजुनाथ आणि बेंगळूरचे भरत भूषण यांचा समावेश आहे. या घटनेनंतर कर्नाटक राज्य आणि संपूर्ण देश शोक व्यक्त करत असतांना रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन मात्र या सगळ्याशी काही संबंध नाही, अशा प्रकारे आनंदोत्सवात मग्न आहेत. रामनगरमध्ये आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा स्तरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला आलेल्या सहस्रो महिलांना विनामूल्य साड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. (हे एक प्रकारे आमीषच नव्हे का ? यासाठी निधी कुठून आणला ?, हे जनतेसमोर आले पाहिजे ! – संपादक)