Panvel Mahavitran Corrupt Officials : पनवेल येथे पावणे दोन लाख रुपयांची लाच घेणारे महावितरणचे दोन अभियंते अटकेत !

मुंबई : महाराष्ट्र विद्युत वितरण आस्थापनाच्या केलेल्या कामाचे देयक देण्यासाठी ठेकेदार आस्थापनाकडून १ लाख ८४ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी पनवेल भिंगारी येथील उपकार्यकारी अभियंता संदीप आण्णासाहेब डावरे आणि कनिष्ठ अभियंता प्रथमेश नवचंद्र चोगुले यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

देयकांच्या रकमेवर टक्केवारीप्रमाणे प्रत्येकी ९२ सहस्र असे एकूण १ लाख ८४ सहस्र रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने पैसे देण्याची सिद्धता दर्शवून या प्रकरणी तक्रार केली. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले.

संपादकीय भूमिका

सरकारने अशांना तात्काळ बडतर्फच करायला हवे !