स्थळ ठरलेले नसतांनाही ‘सनबर्न’कडून तिकीटविक्रीला प्रारंभ

‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !

तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती ! समाजात जनजागृती करण्यासाठी समितीच्या वतीने तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानातून हिंदु संस्कृतीविषयी जागृती !

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत ? या संदर्भात माहिती देण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी प्रतिदिन एक घंटा वेळ देऊन कृतीच्या स्तरावर सिद्ध  व्हा ! – कु. प्राची शिंत्रे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना देवता, राजे, वीर योद्धे यांनी शौर्याचा इतिहास दिला आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःतील हिंदुत्व जागृत राखणे, हिंदुत्व जोपासणे हेच हिंदूंसाठी ‘शौर्य जागरण’ आहे. ‘३१ डिसेंबर साजरा करणे’ ही एक वैचारिक विकृती असून त्याला आपण विरोध केलाच पाहिजे.

जोगश्वरी (मुंबई) येथील शिकवणीवर्गांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.

पुणे येथे ‘हिंदु नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा’ या विषयीच्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

आंबेगाव पठार (पुणे) ज्ञान प्रसारक विद्या मंदिरात मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून केला सन्मान !

ख्रिस्‍ती नववर्ष स्‍वागताच्‍या नावाखाली मुंबईत तरुणांचा धिंगाणा !

नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी ठिकठिकाणी मध्‍यरात्री फटाके फोडण्‍यात आले. जुहू आणि खार येथे पबमध्‍ये रात्रभर पार्ट्या चालू होत्‍या. यांमध्‍ये सामाजिक अंतर, मास्‍कचा वापर आदी कोरोनाच्‍या नियमांची पायमल्ली करण्‍यात आली.

ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांकडून समुद्रकिनार्‍यांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन

रात्री चालू झालेली संगीत रजनी नियमबाह्यरित्या सकाळी १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणार ध्वनीप्रदूषण होत होते. या घटनेवरून कळंगुटवासीय म्हणाले, ‘‘सरकारचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम केवळ कागदोपत्रीच राहिले.’’

गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने विमान आणि बससेवा यांचे दर गगनाला भिडले : पर्यटकांची लूट

शासनाचे विमान आणि बससेवा यांच्या तिकिटांच्या दरावर कोणतेही नियंत्रण नाही का ?

हिंदूंनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचा संदेश देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून ट्विटरद्वारे राष्ट्रव्यापी अभियान !

‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नहीं’ हा हॅशटॅग ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी !