३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !

सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस तसेच शाळा-महाविद्यालये यांना निवेदनाद्वारे गैरप्रकार रोखण्याचे आवाहन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांना ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

सांगली जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर शाळा-महाविद्यालय आणि प्रशासनाकडून कृतीशील प्रतिसाद मिळणे !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली. या अभियानात १७ लोकप्रतिनिधी, २९ प्रशासकीय अधिकारी, तसेच १८ अन्यांना निवेदन देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर प्रशासनाकडून कृती करण्याचे आश्वासन !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ११ प्रशासकीय अधिकारी, ३८ शाळा, १२ महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली, तसेच ५५ हून अधिक फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहिण्यात आला.

३१ डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध – आदित्य ठाकरे, पालकमंत्री, मुंबई

कोरोनाबाधितांच्या संख्येत वृद्धी होत आहे. त्यामुळे शहरात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

नवर्षारंभ ‘३१ डिसेंबर’ला नव्‍हे, तर गुढीपाडव्‍याला साजरा करा !

वर्तमान स्‍थितीत ३१ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्रीपासून तथाकथित नववर्ष स्‍वागतासाठी आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्‍स, सार्वजनिक, ऐतिहासिक ठिकाणे येथे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन, अभक्ष्य भक्षण करते. या संस्‍कृतीविरोधी गोष्‍टी थांबवण्‍यासाठी व्‍यापक स्‍तरावर जागृती करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठीच हा लेखप्रपंच !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत जनजागृती मोहीम !

ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबर हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या कालावधीत होणारे गैरप्रकार रोखावेत यासाठी सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने देण्यात आली.

‘३१ डिसेंबर’च्या नावाखाली चालणार्‍या अपप्रकारांना प्रतिबंध घाला !

जळगाव आणि नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची मागणी ‘३१ डिसेंबर’च्या नावाखाली चालणार्‍या अपप्रकारांना प्रतिबंध घाला !

ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने !

३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार रोखण्याविषयी मोहीम, ३१ डिसेंबरला युवकांचे होणारे खच्चीकरण रोखण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालये येथे प्रबोधन !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांची विटंबना होऊ नये, याकडे हिंदूंनी गांभीर्याने पहावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी प्रशासनाचा दुटप्पीपणा असतो. अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी आवाज, प्रदूषण आदींची प्रशासनाकडून गंभीरतेने नोंद घेतली जात नाही.