शासनाचे विमान आणि बससेवा यांच्या तिकिटांच्या दरावर कोणतेही नियंत्रण नाही का ?
पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी देश-विदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विमान आणि बससेवा यांचे दर अनेक पटींनी वाढवण्यात आले आहेत.
A happy New Year for airlines: Flights out of Goa cost up to 4x the usual price https://t.co/XCuUlbcmNM
— TOI Goa (@TOIGoaNews) December 28, 2021
विमानाने गोव्यात येण्यासाठी प्रतिप्रवासी ४ ते ५ सहस्र रुपये असलेले एक तिकीट ८ सहस्र ते २० सहस्र रुपयांपर्यंत विकले जात आहे. एरवी पुणे ते गोवा या वातानुकूलित बसप्रवासासाठी १ सहस्र ते १ सहस्र २०० रुपयांपर्यंत तिकीट आहे; मात्र सध्या हे तिकीट वाढून १ सहस्र ८०० ते २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत आकारले जाते. ३१ डिसेंबरनंतर परतीच्या प्रवासाची तिकिटेही महागली आहेत. गोवा-मुंबई या बसप्रवासासाठी पर्यटकांना नियमित तिकिटाऐवजी त्याच्या तिप्पट म्हणजे प्रतितिकीट ३ सहस्र रुपये मोजावे लागणार आहेत. ३० डिसेंबरनंतर विमानाने गोव्याहून देशातील प्रमुख ‘मेट्रो’ शहरांत जाण्यासाठी ५ ते ६ सहस्र रुपये तिकीट दर आकारला जात आहे.