ख्रिस्‍ती नववर्ष स्‍वागताच्‍या नावाखाली मुंबईत तरुणांचा धिंगाणा !

दादर येथे सरत्‍या वर्षाचा प्रतिकात्‍मक पुतळा करून काढली प्रेतयात्रा !

या सर्वांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही ?

मुंबई, २ जानेवारी (वार्ता.) – मुंबईमध्‍ये जमावबंदीच्‍या आदेश झुगारून ख्रिस्‍ती नववर्ष साजरे करण्‍याच्‍या नावाखाली ३१ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्री अनेकांनी रस्‍त्‍यावर धिंगाणा घातला. दादरमध्‍ये नायगाव येथील सदानंद जाधव मार्गावर मध्‍यरात्री १२ वाजता युवकांनी वर्ष २०२१ या सरत्‍या वर्षाचा प्रतिकात्‍मक पुतळ्‍याची तिरडीवरून प्रेतयात्रा काढली. या वेळी युवकांनी आरडा ओरडा करत धिंगाणा घातला.

नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी ठिकठिकाणी मध्‍यरात्री फटाके फोडण्‍यात आले. जुहू आणि खार येथे पबमध्‍ये रात्रभर पार्ट्या चालू होत्‍या. यांमध्‍ये सामाजिक अंतर, मास्‍कचा वापर आदी कोरोनाच्‍या नियमांची पायमल्ली करण्‍यात आली.