पिंपळे सौदागर (पुणे) येथे नागरिकांनी मानवी साखळी सिद्ध करून ‘नदीफ्रंट विकास प्रकल्पा’चा केला निषेध !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘नदीफ्रंट विकास प्रकल्पा’ला विरोध करत निदर्शने केली. पर्यावरण संवर्धनासाठी १०० हून अधिक नागरिकांनी ‘रिव्हर कन्झर्वेशन २.०’ या आंदोलनाचा भाग असलेल्या या आंदोलनातून नदी प्रदूषण आणि पुनरुज्जीवनाच्या आवश्यकतेविषयी जागृती केली