Maulana Arshad Madani Appeal To Muslims : नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घाला !

‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांचे मुसलमानांना आवाहन  

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी

नवी देहली –  ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या मुसलमानांच्या धार्मिक संस्थेचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंधप्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि खासदार चिराग पासवान यांसारख्या नेत्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.

मौलाना मदनी म्हणाले की,

हे नेते स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात आणि मुसलमानांवर होणार्‍या अत्याचार आणि अन्याय यांवर मौन बाळगतात. (देशात अल्पसंख्याक मुसलमान दंगली घडवतात, हिंदूंची दुकाने, घरे आणि गाड्या जाळतात. असे असतांना मुसलमानांवर अत्याचार आणि अन्याय होतो, असा उलटा प्रचार करणार्‍या मुसलमानांचा ढोंगीपणाच दिसून येतो ! – संपादक) ते सध्याच्या केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा भाग आहेत. ते सत्तेच्या लोभापोटी मुसलमानांविरुद्ध भाजपला पाठिंबा देत आहेत. वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविषयीच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष चेहर्‍यावरील मुखवटा उतरला आहे. देशात द्वेष आणि अन्यायाचे वातावरण आहे आणि हे नेते गप्प आहेत, असा आरोप त्यांनी केला.