पुणे येथील ७९ ठिकाणांचे पाणी दूषित !

पुणे – येथे गुइलेन बॅरी सिंड्रोमचा उद्रेक झाल्यामुळे महापालिका सतर्क झाली. त्यामुळे रुग्ण आढळलेल्या परिसरातील ३१२ ठिकाणांच्या पाण्याचे नमुने २१ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत रासायनिक आणि जैविक पडताळणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यातील ७९ ठिकाणांचे पाणी नमुने दूषित आढळले असून त्यात ई-कोलाय आणि कॉलीफॉर्म जीवाणू आढळले. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेसह खडकवासला परिसरातील पाण्याच्या नमुन्यांचा समावेश आहे.