Sanjay Nirupam Shivsena : नागपूरमधील दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवावा !

मुंबई : नागपूर दंगलीतील दंगलखोरांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. त्यांची मालमत्ता विकून शासनाने हानीची रक्कम वसूल करावी, तसेच दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवावा, मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते आणि प्रवक्ते संजय निरूपम यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

संजय निरूपम पुढे म्हणाले, ‘‘या दंगलीच्या प्रकरणी आतापर्यंत १०४ संशयितांना अटक झाली आहे. या प्रकरणात सामाजिक प्रसारमाध्यमांवर सक्रीय असलेला ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेशी संबधित आहे. यापूर्वी मोमीनपूरा येथे सामाजिक प्रसारमाध्यमांवर सक्रीय असलेल्या काहींनी आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी.’’

संपादकीय भूमिका

दंगली झाल्यावरच दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांची आठवण होऊन त्या पाडण्याची मागणी होऊ नये, तर प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे किंबहुना अशी बांधकामे होऊ नयेत, याकडे प्रशासन आणि पोलीस यांनी प्रयत्न केला पाहिजे !