
मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपमानजनक काव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हास्यकलाकार कुणाल कामरा याला चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी दुसर्यांदा समन्स दिले आहे. २५ मार्च या दिवशी पोलिसांनी कुणाल कामरा याची त्याच्या मुंबईतील निवासस्थानी चौकशी केली; मात्र तेथे तो आढळला नाही.
यापूर्वी कुणाल कामरा याला २५ मार्च या दिवशी चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले होते; मात्र तो अनुपस्थित राहिला. कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकारानंतर कुणाल कामरा याने क्षमा मागण्यास नकार देत स्वत:च्या कृतीचे समर्थन केले आहे.