सातारा, २७ मार्च (वार्ता.) – महाबळेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालय तेथे ’असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. अतीतातडीच्या मोजणीसाठी पैसे भरूनही अनेक महिने प्रतीक्षा करण्याची वेळ तालुक्यातील शेतकर्यांवर आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. पाचगणी येथील एका शेतकर्याने अतीतातडीच्या मोजणीसाठी ६ महिन्यांपूर्वी पैसे भरले होते; मात्र वारंवार भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत त्यांच्या भूमीची मोजणी पूर्ण झालेली नाही. (संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)