SP President Akhilesh Yadav : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने करण्यात आला !’

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे संतापजनक विधान !

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने करण्यात आला होता, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांनी केले होते.

अखिलेश यादव यांना कारागृहात डांबा ! – जयकुमार रावल, पणनमंत्री, महाराष्ट्र

श्री. जयकुमार रावल

या प्रकरणी ‘समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी क्षमा मागावी. चुकीची माहिती दिल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांना कारागृहात पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्राचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

रावल म्हणाले, ‘‘समाजवादी पक्षाचे नेते इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. राजकारणात जय-पराजय होतात; पण याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्या महापुरुषांविषयी चुकीची विधाने करतो. देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावणारी राजकीय लाभासाठी अशी विधाने केली जात आहेत, हे पुष्कळ दुःखद आहे. इतिहासाशी छेडछाड केलेली स्वीकारली जाणार नाही. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्‍वास ठेवते आणि त्यांचा आदर करते.’’

संपादकीय भूमिका

  • कारसेवकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारणार्‍या मुलायमसिंह यादव यांच्या पुत्राकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अद्वितीय आणि ‘न भूतो न भविष्यति’ असा झाला होता. असे असतांना इतिहासात फेरफार करणारे आणि राज्याभिषेकाविषयी अतार्किक विधाने करून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला काळीमा फासण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या विरोधात शिवप्रेमींनी पोलिसांत तक्रार करायला हवी ! असे केल्यावर पुन्हा अशा प्रकारचे विधान करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !