नागपूर दंगलग्रस्त भागाची पहाणी करणार्‍या काँग्रेसच्या समितीला पोलिसांनी अनुमती नाकारली !

दंगलग्रस्त भागात गेल्यास गुन्हे नोंदवण्याची पोलिसांची चेतावणी !

नागपूर – शहरातील दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेली समिती २२ मार्च या दिवशी शहरात आली आहे; मात्र नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास मनाई केली आहे. पोलिसांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना याविषयीचे पत्र दिले असून समितीचे सदस्य दंगलग्रस्त भागात गेल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची चेतावणी दिली आहे. समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पहाणीसाठी अनुमती मागण्याचे नियोजन केले आहे.

या समितीमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अधिवक्त्या यशोमती ठाकूर आणि आमदार साजिद पठाण यांचा समावेश आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक, तर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे हेसमन्वयक आहेत.