आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. 

प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे साधकांना विविध विषयांवर ज्ञान स्फुरणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेमुळे केवळ मलाच नव्हे, तर सनातनच्या बर्‍याच साधकांना अध्यात्म, साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे लिखाण आपोआप सुचत आहे. साधकांना येणार्‍या या अनुभूतीमुळे ‘कर्ता मी नसून गुरु आहेत’ हा भाव साधकांमध्ये निर्माण झाल्याने त्यांचा अहंभाव नष्ट होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्रतेने होत आहे.

सृष्टीची निर्मिती होण्यामागील आध्यात्मिक कारण आणि त्यामागील सूक्ष्म प्रक्रिया 

ज्या जिवांना ‘प्रकृती ही भासमान आहे. त्यात केवळ सुख आणि दुःख आहे. यात न अडकता मला आनंदप्राप्तीसाठी ईश्वराकडे जायचे आहे’, अशी जाणीव असते, त्यांना ईश्वर प्रकृतीतून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करतो; कारण ईश्वर ‘भक्तवत्सल, कृपाळू आणि प्रीतीस्वरूप’ आहे. 

महान अवतारी तत्त्वाचे वर्णन मी कैचे करी ।

धर्म संस्थापनेच्या कार्या । अडथळे अनेक स्थूल अन् सूक्ष्म ।।

श्री महाकाली होमाचा पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षींच्या आज्ञेने १२.९.२०२४ या दिवशी कांचीपुरम् येथील सेवाकेंद्रात श्री महाकाली होम करण्यात आला. ‘श्री महाकाली होमाचा होमाचे पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतात ?’, हे अभ्यासण्यासाठी संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद किटकरू यांचा ७३ वा जन्मसोहळा आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सहवासातील आठवणी !

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शरदराव किटकरू यांचा ७३ वा जन्मसोहळा त्यांच्या कुटुंबियांनी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही उपस्थित होते…

थोडक्यात महत्त्वाचे

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा भाग असलेला बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी २,७८२ कोटींचा खर्च अंदाजित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या अल्प होईल.

खेडच्या तहसीलदार देवरे यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी !

बनावट शिधापत्रिका (रेशनिंग कार्ड) दिल्याप्रकरणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांच्या कारवाईतून ७० गुन्ह्यांची उकल !

ठाणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने कुख्यात चोरट्यांना शोधून काढले आहे. अशा गुप्त कारवाईतून ७० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि शीळ डायघर परिसरातून सोन्याची साखळी आणि मंगळसूत्र सापडले आहे.

ईश्वरपूरला (जिल्हा सांगली) प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्मातील अनेक विषयांवर मार्गदर्शन करून दिलेला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादरूपी बोलाचा उलगडणारा भावार्थ !

२४ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे श्रेष्ठत्व बुद्धीला पटणे, प.पू. बाबांनी प्रथम भेटीतच ‘दुःखाचे जे मूळ’ या भजनाचा अर्थ उलगडून सांगतांना पतीच्या अहंकाराची जाणीव करून देणे आणि त्यातून त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची जाणीव होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.