Suhas Subramanyam : खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या ६ नवनिर्वाचित खासदारांनी घेतली शपथ

खासदार सुहास सुब्रह्मण्यम्

वॉशिंग्टन (अमेरिका) – नुकतेच अमेरिकेतील भारतीय वंशाचे नवनिर्वाचित खासदार सुहास सुब्रह्मण्यम्, अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार यांनी संसदेत शपथ घेतली. अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ या कनिष्ठ सभागृहामध्ये भारतीय वंशाच्या ६ खासदारांनी एकत्र शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या वेळी खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

शपथ घेतल्यानंतर सुहास सुब्रह्मण्यम् म्हणाले, ‘‘माझ्या पालकांनी मला व्हर्जिनियातील पहिला भारतीय अमेरिकी आणि दक्षिण आशियाई खासदार म्हणून शपथ घेतांना पाहिले.

भारतातून डलास विमानतळावर पहिल्यांदा उतरतांना जर तुम्ही माझ्या आईला सांगितले असते की, तिचा मुलगा भविष्यात व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करेल, तर कदाचित् तिचा विश्‍वास बसला नसता.’’