Pannu Threatens MahaKumbh Again : अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी पन्नू याची महाकुंभाला पुन्हा एकदा धमकी !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी आणि ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंह पन्नू याने पुन्हा एकदा प्रयागराज येथील महाकुंभाला धमकी दिली आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ‘महाकुंभ प्रयागराज २०२५ युद्धभूमी बनेल’, अशी धमकी त्याने दिली आहे. तसेच लक्ष्मणपुरी (लखनौ) आणि प्रयागराज येथे खलिस्तानी अन् काश्मीरचे झेंडे फडकवण्याचे लोकांना आवाहन केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज येथे महाकुंभ होणार आहे.

संपादकीय भूमिका

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, तसे पन्नूसारख्यांच्या धमक्यांमुळे महाकुंभावर कोणतेही संकट येऊ शकणार नाही ! पन्नूच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने अमेरिकेवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !