पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम ६७ टक्के पूर्ण !
मुंबई – मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा भाग असलेला बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी २,७८२ कोटींचा खर्च अंदाजित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या अल्प होईल.
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी २६ आरोपींवर मकोका !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी २६ आरोपींवर मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) लावला आहे. या प्रकरणी अद्यापही ३ आरोपींना शोधणे बाकी आहेत.
मकोकाअंतर्गत आरोपींची पोलीस कोठडी ३० दिवसांपर्यंत असू शकते. या कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा ही मृत्यूदंडाची असते, तर किमान ५ वर्षांच्या कारावासाचेही प्रावधान केले आहे.
गोंदिया येथे पुन्हा अपघात !
गोंदिया – येथे नागपूरहून गोंदियाला जाणार्या शिवशाही बसचा २९ नोव्हेंबरला अपघातात झाला होता. त्यात ११ प्रवाशांचा मृत्यू आणि २० प्रवासी घायाळ झाले होते. दुसर्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबर या दिवशी येथील देवरी येथे शाळेतील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी निघालेली बस रस्त्याच्या कडेला खाली गेली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरून नियंत्रण सुटले आणि ती कडेला खाली गेली. यात चालक आणि वाहक किरकोळ घायाळ झाले आहेत.
वेश्याव्यवसाय चालवणार्या ३ धर्मांधांना अटक !
अशांना कारागृहातच डांबायला हवे !
ठाणे – येथील पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणार्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. रईसा खान (वय ४६ वर्षे), जोया शेख (वय २५ वर्षे) आणि युनीस शेख (वय ४५ वर्षे) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून १ अल्पवयीन मुलगी आणि ८ महिलांची सुटका केली आहे.
‘इ.व्ही.एम्.’वरील आरोपांविषयी निवडणूक आयोग काँग्रेसचे शंकानिरसन करणार !
मुंबई – काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांसह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रांमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसकडून याविषयी निवडणूक आयोगाकडेही पत्र पाठवण्यात आले होते. ‘इ.व्ही.एम्.’विषयीच्या या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोग काँग्रेसच्या नेत्यांसमवेत बैठक घेणार आहे. ३ डिसेंबर या दिवशी ही बैठक होणार आहे.