दुसर्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने कारागृहातून बाहेर येणे अशक्य
जोधपूर (राजस्थान) – संतश्री पू. आसारामजी बापू यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. सुरत (गुजरात) येथील आश्रमात महिलेवर कथित बलात्कार केल्याच्या प्रकरणात त्यांना जामीन संमत करण्यात आला आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत हा जामीन असणार आहे.
या काळात पुराव्यांशी छेडछाड करू नये, अनुयायींना भेटू नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. सध्या ते जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अन्य एका बलात्कारच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे जामीन मिळाला, तरी त्यांना कारागृहातून बाहेर येणे अशक्य आहे.