महान अवतारी तत्त्वाचे वर्णन मी कैचे करी ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काव्य – ‘सूक्ष्मातील कार्य’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्म संस्थापनेच्या कार्या ।
अडथळे अनेक स्थूल अन् सूक्ष्म ।। १ ।।

नानाविध वाईट शक्तींचे ।
सैन्य मोठे अदृश्य असे ।। २ ।।

समाजास सर्वत्र जखडून टाकती ।
तेथे बुद्धीचे सामर्थ्य कामा न येई ।। ३ ।।

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

हेच मूळ असे धर्म पतनास
अन् अधर्माचरणास ।
म्हणती मूळ उखडून टाकावे, कसे ते सांगतो आपणास ।। ४ ।।

साधना वाढवोनी अन् धरोनी नामाची कास ।
मिळेल सामर्थ्य तुम्हा, वाईट शक्तीशी लढण्यास ।। ५ ।।

सामर्थ्यवान सेनापती (टीप १) साधका लढण्या शिकवितसे  ।
परंतु प्रत्यक्षात स्वतःच वाईट शक्तींशी अहोरात्र लढतसे ।। ६ ।।

हे जाणण्या सूक्ष्म ज्ञान अन् गुरुकृपा लागतसे ।
न कळे अज्ञानी समाजास हा खेळ कसा चालतसे ।। ७ ।।

अशा महान अवतारी तत्त्वाचे (टीप २) वर्णन मी कैचे करी ।
वाणी अन् मती थकेल, अनेक जन्म घेतले जरी ।। ८ ।।

इदं न मम ।

सच्चिदानंद परब्रह्म गुरुचरणार्पणमस्तु ।

टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

टीप २ – सप्तर्षी ‘जीवनाडीपट्टी’, तसेच विविध नाडीभविष्य ग्रंथांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे.

– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.