भोकर (श्रीरामपूर) येथे धर्मांधासह आई-वडिलांवर गुन्हा नोंद !

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरण

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आमीर शेख याच्यासह वडील आजीज बबन शेख आणि आई सलमा शेख यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. एका अल्पवयीन मुलीला आमीर हा वर्ष २०२१ पासून ३ जानेवारी २०२५ पर्यंत दुचाकीवरून फिरवत होता. ती अल्पवयीन आहे, हे ठाऊक असूनही त्याने तिला अनेक आमिषे दाखवली. तिची छायाचित्रे आणि चित्रफीती ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या कृत्यांसाठी त्याच्या आई-वडिलांनी साहाय्य केले, असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुले आणि त्यांचे पालक यांची वासनांध मानसिकता लक्षात येते. हिंदु मुलींनी धर्मांधांपासून लांब रहायला हवे, हे पालकांनी मुलींच्या मनावर बिंबवणे आवश्यक !