Nepal Earthquake : नेपाळमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : ९५ जणांचा मृत्यू

भारतात देहली, बिहार आणि बंगाल राज्यांनाही जाणवले धक्के

नवी देहली – नेपाळमध्ये ७ जानेवारीला सकाळी ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला, तर ६२ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये अनुमाने १० सहस्र लोक मृत्यूमुखी पडले होते.

नेपाळमधील या भूकंपांच्या मालिकेचा भारतावरही परिणाम झाला आहे. भारतातील बिहार, बंगाल आणि आसाम येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बिहारच्या मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझफ्फरपूर येथे सकाळी ६.४० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घरांबाहेर पडले. नेपाळमध्ये गेल्या ७ दिवसांत ३ वेळा भूकंप झाला आहे. यांमध्ये २ जानेवारीला झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.८ रिक्टर स्केल एवढी होती, तर ३ जानेवारीच्या भूकंपाची तीव्रता ४.४ रिक्टर स्केल एवढी होती.

तिबेटमध्ये भूकंपात ५० हून अधिक ठार !

तिबेटच्या जिजांगमध्येही  ७ जानेवारीला सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले या भूकंपात ५० हून अधिक जण ठार झाल्याचे वृत्त आहे.