बांधकामाशी संबंधित कृती भावपूर्ण, परिपूर्ण आणि सेवाभावाने केल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात !
बांधकामाशी संबंधित कृती करतांना त्यातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.