नामजपाचे महत्त्व

ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…

आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !

‘हिंदुस्थानातील संपूर्ण हिंदु समाज सारा केव्हा तरी पूर्ण संघटित होईल नि मग हिंदु राष्ट्र स्वतंत्र होईल’, ही खुळी कल्पना आहे. तसे कधीच घडणार नाही; परंतु राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी राष्ट्राची काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत..

सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.

ध्वनीप्रदूषणासंबंधींच्या तक्रारींवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई का केली नाही ?

‘ध्वनीप्रदूषणासंबंधी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एकूण २२ तक्रारी नोंद झाल्या आहेत आणि यांपैकी १६ तक्रारींवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ६ प्रकरणे कारवाईसाठी जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, पोलीस आणि संबंधित पंचायत यांच्याकडे..

आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस : गुरुपौर्णिमा

व्यापारी दिवाळीच्या दिवसांत वहीखाते पहातो की, कोणत्या वस्तूने व्यापारात लाभ झाला आणि कोणती वस्तू पडून राहिली ? हे बघतो, असेच साधकांसाठी गतवर्षीच्या आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा असतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांनी उलगडलेली वैशिष्ट्ये !

केवळ अभ्यासवर्गांतील मार्गदर्शनातूनच नव्हे, तर स्वतःच्या आचरणातूनही ‘आदर्श साधक’ घडवणारी महान विभूती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

आश्रम सोडतांना वास्तुदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून ‘कृतज्ञताभाव कसा असावा ?’, हे शिकवणारे प.पू. डॉक्टर !

फोंडा येथील सुखसागर आश्रम सोडतांना प.पू. डॉक्टर साधकांना म्हणाले, ‘‘या आश्रमाने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे.त्यांनी वास्तुदेवतेला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.