|
नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील शेंडे गल्ली भरावजवळील काटवनामध्ये कत्तल (वध) करण्यासाठी आणलेल्या १७ गायी, ६ गोवंशीय कालवडी आणि ४ गोवंशीय गोर्हे यांची सुटका करण्यात आली. या गोवंशीय जनावरांचे बाजारभावाने १३ लाख ४० सहस्र रुपये एवढे मूल्य निर्धारित होते. या प्रकरणी धर्मांध नदीम चौधरी, फिरोज अन्सारी देशमुख, शोएब खाटीक, खलील चौधरी, अबू चौधरी, मोजी चौधरी, जबी चौधरी, अन्सार चौधरी आणि अकील चौधरी अशा ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २ जानेवारी या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यांतील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेले आहेत. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्या वेळी पोलिसांच्या गुप्तहेरांकडून काटवनात गोवंशीय जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमवेत पोलीस पथक काटवनामध्ये गेले. पोलीस अधिकारी येत असल्याचे पाहून सर्व धर्मांध जनावरांना सोडून पसार झाले.
श्रीरामपूर येथे १ सहस्र ७० किलो गोमांस जप्त करून ३ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील प्रभाग क्र. २ मधील कुरेशी मोहल्ला येथे शहर पोलिसांनी धाड घालून १ सहस्र ७० किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी जावेद उपाख्य भुर्या कुरेशी, अरबाज कुरेशी आणि फय्याज कुरेशी यांच्या महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायी आणि गोमांस यांची तस्करी चालू असणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
एका पत्र्याच्या शेडमध्ये ३ व्यक्ती जनावरांची कत्तल (वध) करत आहेत आणि मांस विक्रीसाठी नेत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंच आणि पशू वैद्यकीय अधिकारी यांच्यासह धाड घातली. त्या वेळी ३ व्यक्ती गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांसाचे तुकडे करतांना आढळले.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायदा संमत झाला असला, तरी अद्यापही गोवंशांचा वध होतो. त्यासाठी तस्करी केली जाते. कायदा आणि पोलीस यांना न जुमानणार्या धर्मांधांना सरकार कसे वठणीवर आणणार ? |