‘इन्स्टाग्राम’वरून नग्न छायाचित्रे प्रसिद्ध केली !
पुणे – एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लॉजवर नेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तिच्या ‘इन्स्टाग्राम’च्या खात्यावर तिचे नग्न, अर्धनग्न तसेच पूर्ण कपडे घातलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली. तिच्यावर दबाव टाकून पैशांची मागणी केल्याप्रकरणी श्रीयश पतंगे या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. हा प्रकार जून २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये घडला आहे. (महिला आणि मुलींसाठी असुरक्षित पुणे ! – संपादक)
मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार !
पुणे – तरुणीने मैत्रिणीला घरी बोलावून ‘तुला इथेच तिघांबरोबर थांबावे लागेल, नाहीतर आम्ही मारून टाकू’, अशी धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार पोलिसांनी मैत्रिणींसह २ जणांना अटक केली असून २ जणांचा शोध चालू आहे.