Mecca Medina Underwater : जेद्दा, मक्का आणि मदिना येथे पूरसदृश स्थिती !

सौदी अरेबियामध्ये मुसळधार पाऊस

रियाध (सौदी अरेबिया) – जेद्दा, मक्का आणि मदिना या शहरांमध्ये ६ जानेवारीला जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. पावसामुळे अनेक भागांत पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि रस्ते बंद करावे लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. सौदी अरेबियाच्या अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बद्र प्रांतातील अल-शफियाह येथे सर्वाधिक ४९.२ मि.मी., त्यानंतर जेद्दाहमधील अल-बसातीनमध्ये ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अतिरिक्त पावसाच्या मोजमापांमध्ये मदिना येथील पैगंबर मशिदीच्या मध्यवर्ती हरम भागात ३६.१ मि.मी. पाऊस आणि कुबा मशिदीजवळ २८.४ मि.मी. पाऊस पडला. पावसामुळे विमानतळावरील विमानांचे नवीन वेळापत्रक बनवण्यात आले आहे.