पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) – नूतन ख्रिस्ती वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनार्यावर भटक्या कुत्र्यांनी रशियाच्या पर्यटकावर आक्रमण करणे आणि एका ‘स्टिंगर’ने (शिंपल्यासारख्या माशांचा एक प्रकार) एका स्थानिकाला दंश केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
याविषयी ‘दृष्टी मरीन लाईफ् सेव्हिंग सर्व्हिसीस’चे प्रवक्ते माध्यमांना म्हणाले, ‘‘४ जानेवारी या दिवशी दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनार्यावर एका ४५ वर्षीय रशियाच्या नागरिकाचा ३ भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला आणि अखेर त्याला चावा घेतला. घायाळ व्यक्तीच्या पायाला त्वरित
प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचप्रमाणे चालू वर्षीच्या पहिल्या आठवड्यात ताळगाव येथील एका २३ वर्षीय महिलेच्या उजव्या पायाला वेळसाव समुद्रकिनारी ‘स्टिंगर’ने दंश केला होता.’’ डिसेंबर २०२४ मध्य मोबोर आणि बाणावली या समुद्रकिनार्यांवर रशिया आणि इंग्लंड या देशांतील नागरिकांसह एकूण ३ वयोवृद्ध नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता.
संपादकीय भूमिकाप्रशासन समुद्रकिनारे भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवू शकत नाही का ? |