पुणे येथे पंचनाम्यावर स्वाक्षरी न करणार्‍यावर गुन्हा नोंद !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता आरोग्य विभागातील कर्मचारी विठ्ठल आव्हाड यांना एका गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनाम्यासाठी घेतले होते.

Kukke Shree Subrahmanya Temple : कर्नाटकातील कुक्केश्री सुब्रह्मण्य मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी ४ कर्मचार्‍यांना नोटीस

देशात घोटाळा होत नाही, असे एकतरी क्षेत्र शेष आहे का ? भ्रष्टाचार्‍यांना फाशीसारखी शिक्षा होत नसल्यानेच भ्रष्टाचार नष्ट होण्याऐवजी वाढतच चालला आहे !

PIL Against IC-814 Webseries : हिंदु सेनेची वेबसिरीजवर बंदी आणण्‍यासाठी देहली उच्‍च न्‍यायालयात याचिका !

विमान अपहरण करणार्‍या इस्‍लामी आतंकवाद्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्‍यात आल्‍याचे ‘हिंदु सेना’ या संघटनेने प्रविष्‍ट केलेल्‍या या याचिकेत म्‍हटले आहे.

Gujarat Helicopter Crash : गुजरातमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले : ३ जण बेपत्ता

हे हेलिकॉप्टर पोरबंदर किनार्‍यापासून ४५ कि.मी. अंतरावर असणार्‍या एका नौकेतील घायाळ कामगाराला आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी ते समुद्रात कोसळले.

चीनने प्रथम त्याच्या १० लाख चौरस कि.मी.वर रशियाने मिळवलेले नियंत्रण हटवावे ! – तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह

तैवानने आता चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीवर उपरोधिक टीका केली आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी म्हटले आहे की, जर चीनचा तैवानवरील दावा प्रादेशिक अखंडतेशी संबंधित असेल, तर चीन सरकारने रशियाकडून १० लाख चौरस कि.मी. भूमी परत घ्यावी.

Sharia Law In Bangladesh : बांगलादेशात शरीयत कायदा लागू होणार ! – डॉ. तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

असे झाल्‍यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?

WB Minor Girl Molested : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या तरुणाच्या घराची संतप्त जमावाकडून तोडफोड

‘लोकांनी कायदा हातात घेऊ नये’, असे सल्ले दिले जातील; मात्र जनतेला अशी कृती का करावीशी वाटत आहे ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे !

Shimla Mosque Controversy : शिमला (हिमाचल प्रदेश) येथे बेकायदेशीर मशीद पाडण्‍यासाठी हिंदूंनी काढला मोर्चा !

असा मोर्चा काढण्‍याची वेळ हिंदूंवर का येते ? बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम होत असतांना प्रशासन झोपले होते का ?

Uttarakhand Mob Vandalise Muslim Shop : हिंदु मुलीला अश्‍लील हावभाव करून दाखवणार्‍या आरिफच्‍या दुकानाची लोकांनी केली तोडफोड !

‘अशा वासनांधांना तात्‍काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्‍याने जनतेने कायदा हातात घेतला, तर त्‍याला  पोलीस, प्रशासन, सरकार आणि न्‍यायव्‍यवस्‍थाच उत्तरदायी आहे’, असे कुणी म्‍हटले, तर आश्‍चर्य ते काय ?

Rajasthan MIG-29 Crash : बारमेर (राजस्थान) येथे मिग-२९ लढाऊ विमान कोसळले : जीवित हानी नाही

मिग विमाने ‘उडत्या शवपेट्या’ असून त्या भारतीय वायू दलातून त्या हद्दपार करण्याची आवश्यकता असतांना त्यांचा अद्यापही वापर होणे, हे अनाकलनीयच होय !