दक्षिण कन्नड (कर्नाटक) – येथील कुक्केश्री सुब्रह्मण्य मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून ४ कर्मचार्यांना मंदिर प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच येथील कर्मचार्यांचे कामांमध्ये पालट करण्यात आला आहे. लाडूंची संख्या आणि त्यांच्या वितरणामध्ये असलेल्या विसंगतीमुळे, तसेच पावती आणि इतर अतिरिक्त लाडूंच्या वितरणाच्या हिशेबात त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गैरव्यवहार झालेल्या ठिकाणी आणि लाडू सिद्ध करण्याच्या ठिकाणी ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे समजते.
संपादकीय भूमिकादेशात घोटाळा होत नाही, असे एकतरी क्षेत्र शेष आहे का ? भ्रष्टाचार्यांना फाशीसारखी शिक्षा होत नसल्यानेच भ्रष्टाचार नष्ट होण्याऐवजी वाढतच चालला आहे ! |