मुंबई – बुचर आयलंडजवळ १८ डिसेंबर या दिवशी दुपारी ‘नीलकमल’ नावाची फेरी बोट बुडाली असून त्यावरील १०१ जणांना वाचवण्यात आले आहे, तर १३ जणांचा मृत्यू झाला. बुडालेल्यांना वाचवण्यासाठी नौदल आणि मुंबई पोलीस यांच्याकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नौदलाच्या एका स्पीडबोटीने या बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याविषयी विधानसभेत निवेदन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘बोट दुर्घटनेनंतर वेळेत साहाय्य पोचल्यामुळे काही लोकांना वाचवता आले; मात्र काही लोक अद्यापही सापडलेले नाहीत. त्यांचा शोध चालू आहे. ज्या नागरिकांना वाचवण्यात आले, त्यांच्यावर योग्य उपचार चालू आहेत.’’