बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक

रणजित सावरकर

मुंबई – महाराष्ट्रात ९० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत. त्यामुळे बांगलादेशासारखी परिस्थिती महाराष्ट्रातही होऊ शकते; मात्र हिंदूंसाठी ही उठावाची शेवटची संधी आहे; कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर एकट्या मुंबईत आहेत. फळभाज्या, वस्त्रोद्योग यांसारख्या अनेक व्यवसायांवर घुसखोरांनी नियंत्रण मिळवले आहे. या सर्वांमुळे बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशातील घुसखोरांना पोसायचे पाप आपल्या डोक्यावर येईल, असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘वारंवार हिंदूंचे मानसिक खच्चीकरण केले गेले, आमचा इतिहास पराभूतांचा इतिहास आहे, असे भारतियांच्या मनावर बिंबवले गेले; परंतु ही वस्तूस्थिती नाही. भारतियांना शालेय पाठ्यक्रमातून शिकवला गेलेला इतिहास चुकीचा आहे. महाराष्ट्र हिंदूंच्या हातून गेला, तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी ! बांगलादेशी घुसखोरांचा राजसत्तेमध्ये होणारा हस्तक्षेप ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आर्थिक बहिष्कार हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जातपात विसरून हिंदू म्हणून एकत्र या.’’

बांगलादेशाच्या आर्थिक नाड्या आवळणे हाच युद्धापूर्वीचा उपाय ! – वीरमाता अनुराधा गोरे 

बांगलादेशातील हिंदूंसाठी केवळ रस्त्यावर उतरून किंवा निषेध फेर्‍या काढून काही होणार नाही. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर दबाव टाकला पाहिजे. आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळणे हाच युद्धापूर्वीचा उपाय आहे, असे विधान वीरमाता अनुराधा गोरे यांनी या वेळी केले.