संबंधितांवर कठोर कारवाई केल्यासच सोने तस्करीची प्रकरणे अल्प होतील !
मुंबई – विमानतळामधून सोने बाहेर काढून देण्यासाठी सोने तस्करांना साहाय्य करणार्या विमानतळाच्या ३ कर्मचार्यांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. रोहन चव्हाण, अनिल चव्हाण आणि विवेक रेवळे अशी त्यांची नावे आहेत. हे कर्मचारी तस्करांकडून १५ टक्के दलाली घेत होते, असे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अन्वेषणात उघड झाले. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅम सोने कह्यात घेण्यात आले असून त्याचे मूल्य १० कोटी रुपये आहे.
मेणाने भरलेल्या कॅप्सूलमध्ये सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. वरील कर्मचारी या कॅप्सूल सोने तस्कर अर्शद शेख, अरबाज तांबोळी आणि अनस पटेल यांना पोचवत होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.