पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता आरोग्य विभागातील कर्मचारी विठ्ठल आव्हाड यांना एका गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनाम्यासाठी घेतले होते. कागदपत्रे सिद्ध केल्यानंतर ऐन वेळी त्यांनी पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यांच्या कार्यालयाकडूनही घटनास्थळ पंचनामा करण्याचे लेखी आदेश होते, असे असतांनाही त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. विठ्ठल आव्हाड यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.