|
गोपालगंज (बिहार) – येथे ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील तबरेज आलम नावाच्या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण चालूे. त्याने पीडित हिंदु तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला हिंदु तरुणीने नकार दिला. या प्रकरणी पीडित हिंदु तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. आरोपीने पीडित तरुणीला बळजोरीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्याला शोधण्यात येत आहेत. तबरेज आलम सध्या पसार आहे.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या प्रकरणात फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारनेच आता पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘एक हैं तो सेफ हैं’ इतक्यावर न थांबता अशा घटना रोखण्यासाठीही हिंदूंनी सरकारवर दबाव टाकणे आवश्यक आहे ! |